ताज्या बातम्यामहाराष्ट्र
लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलच्या तन्वी मगदूमला आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रौप्य

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (साई) कुस्ती संकुलाची मल्ल तन्वी गुंडेश मगदूम हिने ५९ किलो वजन गटात याँग टाऊ (व्हिएतनाम) येथे झालेल्या २३ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. तिने स्पर्धेत उझबेकिस्थान, किर्गिस्थान, मंगोलिया या देशाच्या मल्लांना गुणाधिक्याने पराभूत केले. अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या व्हीकटोरिया कुशीनोव्हा बरोबर कडवी झुंज दिली. परंतु तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तिला कुस्ती कोच दादासो लवटे, माजी नगराध्यक्ष, वस्ताद सुखदेव एरुडकर आदींचे मार्गदर्शन लाभले.