मुरगुड विद्यालयात नवागतांचे उत्साही स्वागत ; शिवतीर्थावर मुलीने केले शिवप्रतिमेचे पूजन, वृक्षदिंडी रोपवाटप कार्यक्रम संपन्न

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनिअर कॉलेज मुरगुड येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साही वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले.
मुरगुड येथील ऐतिहासिक शिवतीर्थावर सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व नव्याने प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत रोप वितरण करण्यात आले.
यानंतर बाजारपेठेतून वृक्षदिंडी सह स्वागत दिंडी ही काढण्यात आली झाडे लावा झाडे जगवा वृक्ष आमचे मित्र शिकून मोठे व्हा अशा पद्धतीच्या फलकांनी लक्ष वेधले. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना साखर पेढे वाटण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाकडून पंचायत समिती कागल मार्फत उपलब्ध झालेल्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वितरण पहिल्याच दिवशी शाळेमध्ये करण्यात आले.
यावेळी प्राचार्य एस पी पाटील उपप्राचार्य एम.डी.खांटागळे, उपमुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस.डी. साठे तंत्र विभाग प्रमुख पी.बी लोकरे, शिक्षक प्रतिनिधी एस जे कटके, प्रा ए एस मांगोरे ज्येष्ठ शिक्षक ए एस चंदनशिवे , एम बी टिपुगडे , एस.डी कुंभार, ए एस कळंत्रे , सौ. वाय ई देशमुख, सौ.व्ही एस सूर्यवंशी, व्ही.एस.पाटील. सौ.ए.एम.कोळी, सौ.बी.वाय मुसाई , प्रा पी एस पाटील, प्रा. टी आर शेळके, प्रा.टी एस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.