ताज्या बातम्यामहाराष्ट्र
दिलीप कांबळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
हरोली ता-शिरोळ येथील भीम क्रांती सोशल फाउंडेशनच्या वतीने येथील माजी नगरसेवक दिलीप मारुती कांबळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात आला . हा पुरस्कार आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. जोगेंद्र कवाडे व महाराष्ट्र लघुउद्योग महाविकास मंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
या पुरस्कार सोहळ्यास भीम क्रांती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासो कांबळे ,माजी जि.प. सदस्य पी एस कांबळे , पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नंदकुमार गोंधळी व सौ. मंजूषा दिलीप कांबळे उपस्थित होते .