ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड मध्ये श्रीराम नवमी भक्तिमय वातावरणामध्ये साजरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड येथील श्रीराम मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही
रामनवमी भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी सकाळी महाअभिषेक होऊन महाआरती झाली. त्यानंतर ह भ प श्रीरंग पाटील महाराज हळदी (ता.करवीर) यांचे कीर्तन पार पडले.

बारा वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला. यानंतर उपस्थित महिलांनी पाळणा गायला. संध्याकाळी भजन सोहळा झाला. यावेळी सुंठवडा आणि लाडूचे वाटप करण्यात आले.शहरातील राम भक्त आणि मुरगुड उपखंड मधील सर्व भक्तांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते.

सकाळपासूनच प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भावीक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी श्रीराम मंदिर संयोजन समिती आणि भक्त मंडळी यांनी नवीन श्रीराम मंदिराचा संकल्प केला येत्या वर्षभरात नवीन मंदिर उभारण्याचे उद्दिष्ट ठेवूनच कार्य करायचे असा संकल्प करण्यात आला.

यावेळी मंदिराचे पुजारी अनुबोध गाडगीळ, शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, प्रकाश परिशवड, जगदीश गुरव, आनंदा रामाने धनंजय सूर्यवंशी,शिवाजी चौगले, पप्पू कांबळे,अमोल मेटकर,महेश कुलकर्णी,संकेत शहा यांचेसह रामभक्त व शिवभक्त उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks