मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचा वाढदिवस “श्रीराम पर्व” म्हणून साजरा होणार ; विधायक सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसनसाहेब मुश्रीफ हे गोरगरिबांचे नेते आहेत. त्यांचा वाढदिवस तिथीनुसार रविवारी दि. ६ म्हणजेच प्रभु श्री. रामनवमी दिवशी होत आहे. सबंध जिल्हाभर हा वाढदिवस “प्रभू श्रीराम पर्व” म्हणून साजरा होणार आहे.त्यानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यानी गेल्या ३५-४० वर्षांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्ची घातली. त्यांचे आणि गोरगरिबांचे ऋणानुबंध घट्ट आहेत. या लोकनेत्याचा वाढदिवस शाळांच्या स्वच्छतेसह आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, रुग्णांना फळे वाटप, विविध देवतांच्या आरत्या अशा सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे.
सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘धर्मनिरपेक्षता ही काळाची गरज आहे’ असा संकल्प करण्यात येणार आहे.
कोल्हापूर शहरभरासह संपूर्ण जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विशेषता; शाळांच्या स्वच्छतेसह देणगीच्या रूपात शाळांमध्ये लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत.
लोकनेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा वाढदिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद नोंदणी अभियान, असा दुग्धशर्करा योग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून उच्चांकी सभासद नोंदणी करून सबंध महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर बनवून मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांना वाढदिवसाची अनोखी भेट देण्यात येणार आहे.
गोकुळ दूध संघ व केडीसीसी बँकेच्या माध्यमातून मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला बळ दिले आहे .