सदगुरु श्री बाळूमामा भंडारा यात्रा उत्सवात देवस्थान ट्रस्टने दिलेली पाण्याच्या टँकर जबाबदारी मुरगूड येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून पडली पार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदगुरु श्री बाळूमामा भंडारा यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते यात्रेच्या दरम्यान कुठल्याही भाविकाला पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठीह आदमापूर देवस्थान समितीच्या कार्याध्यक्षा रागिनी खडके मॅडम यांनी ही जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट त्यांच्याकडे सोपवली होती त्यांनी विशेष पुढाकार घेत जागोजागी पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी जगदीश गुरव आणि तानाजी भराडे यांनी देखील परिश्रम घेतले.
यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक येतात, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये म्हणून रात्रंदिवस पाण्याची टँकर जागोजागी घेऊन लावले त्यांना सर्व टँकर मालकांचा व बाळूमामा भक्तांचा मोठा हातभार लागला त्यांच्यामुळेच हे पाणी देवळापर्यंत पोहोचू शकले. सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांनी ही व्यवस्था केली. त्यांच्या या उपक्रमामुळे यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळाला भाविकांकडून या सामाजिक कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, अशा उपक्रमामुळे यात्रेतील श्रद्धाळूंना अधिक सुविधा उपलब्ध होत आहेत.