ताज्या बातम्या
हडलगे येथील जिजामाता दूध संस्थेचे उदघाटन

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
हडलगे तालुका गडहिंग्लज येथील नूतन जिजामाता दूध संस्थेचे उदघाटन व श्री भावेशवरी दूध संस्थेच्या सभासदाचा मेळावा चेअरमन मष्णु कोवाडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गोकुळच्या संचालक श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी उपस्थिताना दुग्ध उत्पादन वाढविन्यासंदर्भात माहिती देऊन गोकुळच्या योजनांची माहिती दिली. स्वागत एम. डी. पाटील यांनी केले. प्रास्ताविक संजय कालकुंदरीकर यांनी करून संस्थेची माहिती दिली. यावेळी सरपंच सौ लता पाटील,ज्ञानदेव पाटील,रघुनाथ पाटील यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते हडलगे विकास संस्थेचे चेअरमन संजय पाटील यांनी आभार मानले.