लक्ष्मी-नारायण संस्थेच्या सभासद अपघाती मयत वारसांना एक लाखाचा चेक वितरण

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील ‘सुवर्णमहोत्सवी’ श्री लक्ष्मी-नारायण नागरी सहकारी पत संस्थेचे शाखा मुरगूड कडील मयत कर्जदार कै. कलारीन संतान बारदेस्कर रा. मुरगूड यांच्या पश्चात कु. स्मिता संतान बारदेस्कर या वारसाना दि ओरीएन्टल इस्यो. कंपनी यांचेकडून मिळालेल्या चेकचे वितरण मुख्य कार्यालयात करणेत आले. यावेळी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे संचालक पुंडलीक नाना डाफळे यांनी केले.
चेकचे वितरण संस्थेचे सभापती किशोर पोतदार, उपसभापती दतात्रय कांबळे व जेष्ठ संचालक जवाहर शहा व सर्व संचालक यांचे हस्ते करणेत आले.सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे सभापती किशोर पोतदार उपसभापती दतात्राय कांबळे व जेष्ठ संचालक जवाहर शहा,सर्वश्री संचालक पुंडलीक डाफळे, दत्तात्रय तांबट, अनंत फर्नाडीस चंद्रकांत माळवदे, विनय पोतदार, रविंद्र खराडे, रवींद्र महादेव सणगर, संचालिका सुजाता सुतार, सुनिता सुशांत शिंदे तज्ञ संचालक जगदीश देशपांडे व श्रीमती भारती कामत कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी सचिव मारुती सणगर, उपस्थित होते.उपस्थितांचे आभार कॉम्रेड बबन बारदेस्कर यांनी केले.