ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गोकुळ दूध संघ कर्मचाऱ्यांकडून बाळूमामांच्या भाविकांना ताक वाटप

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आदमापूर ता. भुदरगड येथील श्री सद्गुरू संत बाळूमामा भंडारा उत्सवाला येणाऱ्या भाविकांना गोकुळ दूध संघ शीतकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने अल्पोपाहार व ताक वाटप केले. संघाच्या शीतकरण केंद्रासमोर मंडप उभारून आदमापूर यात्रेला आलेल्या भक्तांना दिवसभर हे वाटप करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख विजय कदम, कामगार प्रतिनिधी उत्तम पाटील, बाळकृष्ण मंडलिक, के. बी. पाटील, दिलीप पाटील, शेखर पाटील, डॉ. पी. एम. पाटील यांच्यासह शीतकरण केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.