सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा ‘मानिनी’ पुरस्काराने सन्मान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च, संकेश्वर द्वारा दिला जाणारा मानाचा पुरस्कार जो संशोधन, समाजकार्य, कला कौशल्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना दिला जातो. या पुरस्काराने सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनी धनश्री प्रवीण पवार -बीए भाग 3, शबनम कमालपाशा मुल्ला- बीए भाग 3 या विद्यार्थिनींचा ‘मानिनी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
विद्यार्थिनींच्या बरोबरच महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या प्रा. मनीषा पाटील मॅडम आणि इतिहास विभागाच्या प्रा. अर्चना कांबळे मॅडम यांना सन्मानित करण्यात आले. यासाठी प्राचार्य एस. एम. होडगे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला मानिनी तसेच विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.