ताज्या बातम्यामहाराष्ट्र

रयत शिक्षण संस्थेची सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

महाराष्ट्रातील एक अग्रगण्य रयत शिक्षण संस्थेचा प्रतिष्ठित समजला जाणारा प्राचार्य पी.जी. पाटील प्रतिष्ठान व सौ. सुमतीबाई पाटील प्रतिष्ठान सातारा यांच्या वतीने सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील दिला जाणारा बॅरिस्टर पी.जी. पाटील गुणवत्ता शिष्यवृत्ती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राप्त झाली.

यामध्ये कु. आदित्य रंगराव केसरकर (बी.ए. भाग -१) कु. प्राजक्ता प्रकाश पाटील (बी.ए. भाग- १) कु. श्रावणी रामचंद्र शिंत्रे (बी.ए. भाग-१) व कु. प्राजक्ता मधुकर आडूरे (बी.ए. भाग-२ ) या विद्यार्थिनींना वरील गुणवत्ता शिष्यवृत्तीचे धनादेश( प्रत्येकी २०००/-) विद्यार्थी गुणगौरव समारंभात शिवराज कॉलेजचे माजी प्राचार्य मा. महादेव कानकेकर व महाविद्यालयाचे मा. प्राचार्य (डॉ.) शिवाजीराव होडगे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागाचे समन्वयक प्रा. दादासाहेब सरदेसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डी.पी. साळुंखे,जिमखाना विभाग प्रमुख डॉ. शिवाजीराव पोवार, प्रा. सौ.अर्चना कांबळे, प्रा. डॉ. गुरुनाथ सामंत  मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks