ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरोली दुमालाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. मधुरा मोरे आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित

सावरवाडी प्रतिनिधी : 

करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ मधुरा मोरे यांना तासगाव च्या प्रतिष्ठा फौंडेशन तर्फ आरोग्य रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

डॉ. मधुरा मोरे यांनी कोरोना महामारीच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या जिद्दीने काम केले – महापुर काळात प्रत्येक गावात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या. डॉ. मोरे यांना सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनात विविध मान्यवरांच्या हस्ते आरोग्य रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  

त्यांना यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचा धन्वंतरी पुरस्कार, विश्वासराव पाटील फौंडेशन तर्फ कोरोना योध्दा पुरस्कार मिळालेले आहेत .कोरोना लसीकरण मोहिम ग्रामीण भागात त्यांनी जोरदार स्वरूपात राबविली होती. डॉ. मोरे यांनी भुये, गगनबाबडा , येथील प्राथमिक आरोग्य केंदात सेवा बजावली. मनमिळावू स्वभाव  व अभ्यासात्मक वृत्ती, समाजाभिमुख  विचारधारा यामुळे त्या लोकप्रिय आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks