गावठी दारुबंदी ही लोकचळवळ व्हावी : मुरगूड परिसर गावठी दारुमुक्त करण्याचा निर्धार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्याच्या चिकोत्रा खोऱ्यामधील दुर्गम, डोंगराळ गावातील गोरगरीब शेतकरी, सामान्य शेतमजूर, कामगार यांचे कुटुंब उद्ध्वस्त करणारे सराईत गावठी दारू व अवैध दारू विक्रेते यांनी मांडलेला काळ्या धंद्याचा डाव लोकसहभागाच्या माध्यमातून उद्ध्वस्त करून दारूबंदी चळवळ ही लोक चळवळ व्हावी अशी भावना स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुरगुड पोलीस स्टेशन येथील आयोजीत बैठकीत करण्यात आली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग यांच्या माध्यमातून कागल तालुक्यातील गावठी अवैध दारू, गांजा, मटका, जुगार याबाबत कागल तालुका नशा मुक्ती जन आंदोलन समितीने निवेदनाद्वारे लक्ष वेधले.
मुरगुड येथे आयोजित सरपंच, पोलीस पाटील, पोलीस व उत्पादन शुल्क प्रशासन यांची संयुक्त सलोखा बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे होते. प्रास्ताविक नशामुक्ती जन आंदोलनचे निमंत्रक आणि सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक अॅड. दयानंद पाटील नंद्याळकर यांनी केले. यावेळी उत्पादन शुल्क भरारी पथकाचे प्रमुख निरीक्षक संजय शीलवंत प्रमुख उपस्थित होते.
उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रमोद खरात म्हणाले, दारूबंदी कायद्यान्वये पोलीस व एक्साईज विभागाकडून गावठी दारूबंदीची कारवाई सुरू आहे. तसेच दारूबंदी कायद्यान्वये ग्राम सुरक्षा दल व लोकसहभागाने गावठी दारूबाबत समाजामध्ये जाणीव, जागृती करून या परिसरातील गावठी व अवैध दारू निर्मूलनाची मोहीम हाती घेऊ या.
स्वागत हेड कॉन्स्टेबल प्रशांत गोजारी यांनी केले. सरपंच परिषदेचे पदाधिकारी संपदा कुंभार, नलिनी सोनाळे, मेघा पाटील, डी. बी. कांबळे लता कांबळे, विलास कांबळे, सागर कांबळे, दत्तात्रय कसलकर आदींसह परिसरातील उपसरपंच, सदस्य तसेच नशामुक्ती आंदोलनचे प्रमुख कार्यकर्ते तसेच अप्पासाहेब पोवार (खडकेवाडा), भारत कुंभार (करड्याळ), राजेश कुंभार (सावर्डे), रमेश ढवण (बिद्री), बाळासाहेब हणबर (बाळीक्रे), शितल कामते (अलाबाद), श्रीकांत कांबळे (तमनाकवाडा), मदन संकपाळ (माद्याळ), भिकाजी धनग (काळामा बेलवाडी), प्रकाश पाटील ( हसुर), निलेश पाटील (बेनिक्ले), दिगंबर कांबळे (अर्जुनी), धनाजी वायदंडे (बस्तवडे), पिराजी कांबळे (मळगे बु ), किरण भट (यमगे), गौतम कांबळे (बोरवडे), अरुणा पाटील (बेलेवाडी मासा), सविता पवार (करंजीवने), उषाताई कुंभार (अर्जुनवाडा), सुनिता चौगुले (हसुर), अश्विनी अस्वले (दौलतवाडी) पोलीस पाटील उपस्थित होते. आभार हेड कॉन्स्टेबल सतीश वर्णे यांनी मानले.