सामान्य व मध्यमवर्गीयांना करवाढ न लावता सादर केलेला या दशकातील सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प : वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
यावर्षीचा अर्थसंकल्प म्हणजे सामान्य व मध्यमवर्गीयांवर कोणतीही करवाढ न लावता सादर केलेला या दशकातील सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प आहे. त्यामुळे अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे मी अभिनंदन करतो.
लाडक्या बहिणींचा ४५ हजार कोटीहून अधिक खर्च असतानासुद्धा केंद्र सरकार व रिझर्व बॅंकेच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत हा अर्थसंकल्प तयार झाला आहे. अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधांना जास्तीत- जास्त प्राधान्य दिले तरच दरडोई उत्पन्न आणि विकासामध्ये भर पडते. त्यामुळे विमानतळ, रेल्वे, मेट्रो, रस्ते, विमानतळ या मूलभूत विकासात्मक गोष्टींना फार मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या नवीन योजनाही या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आणलेल्या आहेत. त्यामुळेच हा अर्थसंकल्प शेतकरी, तरुण, उद्योजक, नोकरदार व लाडक्या बहिणींना अतिशय लाभदायी आहे.