नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी दिला इशारा : “शिवजयंतीच्या आडवे येवू नका”

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
शिवजयंतीच्या मिरवणूकीला प्रशासनाने आडमुठेपणे परवानगी नाकराली आहे. खर तर प्रशासनाला शिवजयंतीचे वावडे का आहे. ठरविक समाजावर आणि सणांवर प्रशासनाचा नेहमी बंधनाचा आसुड का असतो, असा सवाल माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी पत्रकाद्वारे केला आहे. गुन्हे दाखल करा, अटक करा पण मिरवणूक काढणारच असा निर्धारही त्यांनी केला आहे.
यामध्ये म्हटले आहे की, दिवंगत महिपतराव बोंद्रे, सखारामबापू खराडे, रामभाऊ चव्हाण, विष्णूपंत इंगवले, शिवाजीराव चव्हाण, बबनराव कोराणे यांनी सामाजिक जाणिवेचा वस्तुपाठ घालत शिवाजी पेठेतील शिवजयंती उत्सव सुरू ठेवला. असे असताना प्रशासनाने जाणीवपूर्वक शिवजयंतीच्या मिरवणूकीला परवानगी नाकराली आहे. जर प्रशासन आडमुठेपणामुळे आणि चुकीच्या नियमांच्या आधारे परवानगी नाकारत असेल तर शिवाजी पेठेसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी छपन्न गुन्हे अंगावर घ्यायला मी तयार आहे. पण यावेळी मिरवणूक निघणारच आहे. तरी लोकभावनेचा आदर करून प्रशासनाने मिरवणूकीला परवानगी द्यावी अन्यथा होणाऱया उद्कास प्रशासन जबाबदार राहिल, असा इशाराही इंगवले यांनी दिला आहे.