प्रफुल्लीत केंद्रामार्फत ‘बाई पण भारी देवा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक येथील सिद्धाई एज्युकेशन सोसायटी संचलित प्रफुल्लीत केंद्रामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त ‘बाई पण भारी देवा’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांच्या सशक्तिकरनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिवपूजनाने करण्यात आली. प्रफुल्लीत केंद्राच्या महिलांनी नृत्य, लेझीम, झुंबा, योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यामध्ये श्वेता गुरव, संचिता करंबे, सेजल खेडकर, सुरेखा साळुंखे यांनी आपल्या अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली तसेच स्वानंदी शिंदे व सिद्धी चौगुले या दोन छोट्या मुलींनी डान्स करून हम भी कुछ कम नही असा इशाराच महिलांना दिला.
उपस्थित सर्व महिलांसाठी फनी गेम्स, एक मिनिट, स्पॉट गेम व लकी ड्रॉ चे आयोजन केले होते. यामध्ये शिवानी पाटील, सुप्रिया रोकडे, अर्पिता बनसोडे, रूपाली राऊत यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमात स्त्रीशक्तीचा गौरव करणारे विविध प्रेरणादायी सादरीकरण करण्यात आले. महिला दिनी या एकाच दिवशी महिलांचा सन्मान न करता महिलांना त्यांच्यातील क्षमता आणि संधी यांची जाणीव करून त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या जीवनात काहीतरी करण्याची संधी प्रत्येकानेच द्यायला हवी असे यावेळी संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच या सर्व महिलांसाठी निरोगी आरोग्य व प्रफुल्लीत मनासाठी एक महिना मोफत योगा घेण्याचे जाहीर केले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये आदर्श आई अनिता पाटील, आदर्श युवती डॉ.अल्फिया बागवान, आदर्श शिक्षिका दिपाली पाटील, आदर्श संचालिका रेश्मा कातकर, आदर्श सहाय्यक शिक्षिका बिस्मिल्ला नदाफ, आदर्श गृहिणी राजर्षी आबदार, सुजाता चिले, मनीषा सनगर, शबाना बागवान, गीता पाडळकर, आदर्श विद्यार्थिनी श्वेता गुरव, क्षितिजा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील, शिवसेना दक्षिण उपशहर प्रमुख प्रदिप पाटील, शिवानी पाटील, सुनीता वेलणकर, श्रावणी पाडळकर, ऋतिका शिंदे, संचिता करंबे, सुरेखा साळुंखे, उज्वला कांबळे, भारती आसगावकर, संगीता भोसले, संपदा हळदे,सेजल खेडकर, रजनी पाटोळे, नूतन सरनाईक, कांचन कांबळे, विनया मार्गी, भारती जाधव, यासह महिला व मुली मोठ्या संख्येने हजर होत्या.