ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्य व्यापारी नागरी पतसंस्थेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड ता . कागल येथिल रौप्यमहोत्सवी ” श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेत शनिवार दि . ८ / ३ / २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सौ . शुभांगी विष्णूपंत मांडवे , सौ . सुरेखा विठ्ठल डवरी , सौ . सिमा दिपक मगदूम , सौ . सिमा राजाराम जठार , व आश्विनी दिनकर रणवरे या महिला कर्मचाऱ्यानां साडी व गुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला .

यावेळी संचालक किशोर पोतदार यानी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगताना पुरषाबरोबर महिलाही विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत पुढे येत आहेत . त्यांचा सन्मान करणे , महिलांचा आदर , त्यांचा हक्क आणि त्यांचे सक्षमीकरण याबद्दल पोतदार यानीं थोडक्यात माहिती देऊन स्त्री नारी शक्ती विषयी मनोगत व्यक्त केले .

जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमास चेअरमन किरण गवाणकर , व्हा . चेअरमन प्रकाश सणगर, संचालक प्रशांत शहा , किशोर पोतदार , साताप्पा पाटील , शशिकांत दरेकर , नामदेवराव पाटील , हाजी धोंडीबा मकानदार , निवास कदम , संदिप कांबळे , संचालिका सौ . रोहिणी तांबट , सौ . सुनंदा जाधव ,कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर , कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks