ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडमधील १२३४ मिळकतींची ( प्रॉपर्टी) सीटी सर्व्हेला नोंदच नाही ? मिळकत धारकांना दुबार भरावा लागतो कर !

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड शहराचा १९७४ नंतर सीटी सर्व्हेच झालेला नाही त्यामुळे या ५१ वर्षे होवूनही अनेक मिळकतींची स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड निघालेली नाहीत पण संबधित मिळकतधारकांना नगरपालिकेकडे व महसूल विभागाकडे असा दुबार कर भरावा लागत आहे . शहरातील नवीन वसाहतींचा सीटी सर्व्हे केंव्हा होणार ? अशी विचारणा होत आहे .

या शहराच्या महसूली क्षेत्रात १६ नागरी वसाहती वसल्या आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वर कॉलनी जवाहर पॅसेज ‘ निपाणी फोंडा रोड ‘ वाडेकर मळा माधवनगर ‘महाजन कॉलनी ‘ कापशी रोड ‘ सावर्डेकर कॉलनी , भोसले कॉलनी ‘ चिमगाव रोड आंबेडकरनगर , जांभूळखोरा चौगले पाणंद ‘ दतमंदीर व रोहीदास पाणंद तसेच पॅव्हेलियन परिसर अशा १६ ठिकाणी नागरी वसाहती तयार झाल्या आहेत त्याठिकाणी नागरिकांनी कच्ची व पक्की घरे बांधून आपले वास्तव्य वसविले आहे त्या मिळकती १ हजार २३४ इतक्या आहेत . पण त्यांच्या या मिळकतींचा सीटी सर्व्हेमध्ये समावेश नाही . या मिळकतधारकांना सध्या त्यांच्या ७ /१२ नोंदीनुसार महसूली कर भरावा लागतो शिवाय नगरपालिकाही घरफाळा कर आकारणी करते . असा दुहेरी कराचा भुर्दंड या मिळकतधारकांवर बसत आहे .

संबंधित मिळकती या जिल्हाधिकारी आदेशीत बिगरशेती झालेल्या नाहीत त्यामुळे त्यांचा गावठाणात समावेश नसल्याने सीटी सर्व्हे झाला नाही व तशी नोंद भूमी अभिलेखकडे झालेली नसल्याचे सांगण्यात येते .

मुरगूड शहराचा १९७० साली प्लॅनटेबल द्वारे सर्व्हे करून रेखांकन करण्यात आले त्यानुसार प्रत्येक मिळकतीची (घराची ) सनद तयार झाली त्याची छापील प्रत देण्यात आली तर १९७४ ला पूर्ण प्रॉपर्टीकार्ड तयार करून सनद दिली गेली त्यामध्ये आताच्या ५० टक्के मिळकतींचाच समावेश आहे .

१९७४ नंतर ५१ वर्षे होवूनही मुरगूड शहराची हद्दवाढ होवून त्याची सनद झाली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे . नव्या तयार झालेल्या वसाहतीच्या महसूली क्षेत्राचा नगरपालिकेने हद्दवाढीत समावेश करायला हवा . पण संबधितांनी आपले निवासी क्षेत्र बिगरशेती करून घेतल्याशिवाय त्यांचा पालिकेला आपल्या कक्षेत घेता येणार नाही व भूमिअभिलेख कार्यालयही त्याशिवाय सीटीसर्व्हे करणार नाही . त्यामुळे दुबार कर भरणाऱ्या नागरिकांची ना घरका व ना घाटका अशी अवस्था झाली आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks