प्रियांका येरुडकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज संकुलच्या वतीने सत्कार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील प्रियांका येरूडकर यांना ऑल इंडिया सिव्हील सर्व्हिस कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्या बद्दल मुरगूड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज संकुल यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी वस्ताद आनंद गोधडे , मुरगूड चे माजी नगराध्यक्ष राजेखान्न जमादार, माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, माजी नगराध्यक्ष सुखदेव येरूडकर,एम टी सावंत ,पैलवान सुनील शेलार, मनाजी सासने, रंगराव चौगुले, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी प्रमुख पाहुणे यांचे उपस्थितीत पार पडला.
यावेळी राजेखान जमादार म्हणाले, पैलवान हा सुसंस्कृत असला पाहिजे पैलवानांना आपल्या परिस्थितीची जाणीव असणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज संकुलनाने गेल्या चार वर्षात अतिशय सुंदर असे त्यांनी पैलवान घडविले व मुरगूड शहरातून ते बॉईज भरतीसाठी प्रॅक्टिस घेतात याचा आम्हाला अभिमान वाटतो. याबद्दल एन आय एस कुस्ती कोच स्वप्निल इंदलकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, पैलवान प्रियांका येरुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी विनोद चौगुले, सिद्धू दिवटे, सर्जेराव हासबे, अंकुश मांगले यांचेसह छत्रपती शिवाजी महाराज संकुलचे सर्व पैलवान उपस्थित होते.
स्वागत राजू चव्हाण यांनी तर प्रास्ताविक पैलवान आमित तोरसे तर आभार पृथ्वीराज कदम यांनी मानले.