ताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामानुजन मॅथेमॅटिक्स चॅलेंज परीक्षेत अनुप्रियाची हॅट्रिक ; सलग तिसऱ्यांदा ऑल इंडिया रँक

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शांतिनिकेतन स्कूल मध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या ग्लोबल पीस ॲम्बेसिडर भारत विभूषण विश्वविक्रमवीर प्रा. डॉ. अनुप्रिया अमितकुमार गावडे या विद्यार्थिनीने देशपातळीवर घेण्यात आलेल्या रामानुजन मॅथेमॅटिक्स चॅलेंज परीक्षेत सलग तिसऱ्यांदा ऑल इंडिया रँक मिळवून हॅट्रिक साधली आहे.

रामानुजन मॅथेमॅटिक्स परीक्षा ही गणित विषयातील अतिशय अवघड परीक्षा समजली जाते. या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी सहभागी होतात. यावर्षी अनुप्रियाने नववा क्रमांक मिळविला असून गेल्या वर्षी तीने सोळावा क्रमांक प्राप्त केला होता.

अनुप्रियाच्या नावे आजपर्यंत पाच विश्वविक्रम नोंदविले गेले असून ती जगातील अत्यंत कमी वयातील मानद प्रोफेसर आणि डॉक्टरेट मिळवणारी पहिली विद्यार्थिनी आहे.

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांची ब्रँड अँबेसिडर असून आजपर्यंत तिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 50 हून अधिक पारितोषिके व अनेक स्पर्धा परीक्षेत 90 हून अधिक मेडल्स प्राप्त झाले आहे. ती भारताची लिटिल सुपर स्पीकर असून वक्तृत्व, प्रश्नमंजुषा आणि क्रीडा स्पर्धेतही तिने उज्वल यश संपादित केले आहे.

सध्या ती संविधान व बालहक्क कायद्याचे जाणीव जागृतीचे कार्यक्रम हाती घेत असून 5000 हून अधिक नागरिकांना तिने संविधानाचा जागर केला आहे.

ती प्रसिद्ध चार्टर्ड अकौटंट अमितकुमार गावडे व नाईट कॉलेजच्या प्राध्यापिका अक्षता गावडे यांची कन्या असून तिला शांतिनिकेतनच्या संचालिका सौ राजश्री काकडे मॅडम, प्राचार्य सौ जयश्री जाधव, समन्वयका प्रीती नायर व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks