ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलची अपेक्षा पाटील हिंदू गर्जना केसरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

पुणे येथे नुकत्याच झालेल्या हिंदू गर्जना केसरी किताब कुस्ती स्पर्धेत लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलची कु.अपेक्षा पाटील विजेती ठरली तिला अडीच लाख रुपये इलेक्ट्रिक स्कूटी व चांदीची गदा मिळाली .

अपेक्षा पाटीलने उपांत्यफेरीत सृष्टी भोसलेचा ८ – २ गुण फरकाने विजय संपादन करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला . अंतिम सामन्यात पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर प्रगती गायकवाडला अपेक्षाने ३ – २ अशा गुणफरकाने पराभूत करून हिंदू गर्जना केसरी किताब पटकावला .

मंत्री व कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याहस्ते अपेक्षाला हिंदू गर्जना केसरी किताब देण्यात आला . यावेळी अभिनेता अंकुश चौधरी , उद्योगपती पुनीत बालन व धीरज घाटे उपस्थित होते .अपेक्षाला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे ‘ वस्ताद सुखदेव येरुडकर ‘ सागर देसाई , व दयानंद खतकर यांचे मार्गदर्शन मिळाले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks