ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिवराज विद्यालय मुरगुड येथे विद्यार्थ्यांना शासकीय विविध दाखले व प्रमाणपत्राचे वाटप

निकाल न्यूज प्रतिनिधी :
शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगूड येथे 26 जानेवारी 2025 सुवर्ण महोत्सवी उपक्रमांतर्गत शासकीय योजनांचे दाखले वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
या अभियानांतर्गत मुरगूड विभागाचे तलाठी विजय गुरव , कोतवाल शांताराम कांबळे व ई सेवा केंद्राचे चालक गौरव मोर्चे यांच्या हस्ते शिवराज चे प्राचार्य मेजर जी.के .भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जातीचे दाखले .डोमेशियल प्रमाणपत्र, डोंगरी दाखले तसेच उत्पन्नाचे दाखले विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे उपप्राचार्य एल व्ही शर्मा, उपमुख्याध्यापक व्ही डी खंदारे, लिपिक सुरेश सुतार व्होकेशनलचे लिपिक संजय मोरबाळे सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी. रणदिवे यांनी केले तर उप मुख्याध्यापक खंदारे सर यांनी आभार मानले.