कागल तालुक्यातील अवैध धंदे मटका, जुगार अड्डे त्वरित बंद करा : मनसेची निवेदनाद्वारे मागणी

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अनेक वर्ष कागल तालुक्यामध्ये अवैध्य व्यवसाय मटका जुगार अड्डे जोरदार चालू असून यातून गोरगरिबांचे नुकसान होत आहे व त्यांचे संसार रस्त्यावर येत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुक्याला राजकीय विद्यापीठ असे संबोधले जाते. ह्या मटका व जुगारामुळे कागल तालुक्याचे नाव पंचक्रोशीत बदनाम होत आहे. ज्या प्रमाणे आपण इतर ठिकाणी कडक कारवाई केली त्याचप्रमाणे कागल तालुक्यामध्ये कडक कारवाई करावी व कागल तालुक्याची होत असलेली बदनामी थांबवावी. कागल तालुक्यामध्ये आज पर्यंत मटका व्यवसायावर कडक कारवाही झाली नाही आसं आमचे ठाम मत आहे.
आपण कडक कारवाई करावी व कागल च्या नागरिकांना न्याय मिळवून द्यावा ही आपल्याकडून अपेक्षा आहे.आपल्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ झाल्यास मनसे स्टाईलने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे या निवेदनात नमूत केले आहे.
यावेळी मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष विनायक आवळे कागल शहराध्यक्ष दीपक घाडगे, विभाग अध्यक्ष शुभम माळी, विक्रम देसाई, शुभम स्वामी, स्वप्निल कोकरे, तेजस शिंगाडे, शुभम पाटोळे उपस्थित होते.हे निवेदन पोलीस निरीक्षक जालिंदर जाधव (LCB) यांनी स्वीकारले.