ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी डॉक्टर स्नेहल पाटील यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान महिलांना प्रेरणादायी; शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिलादिनी जिल्हा क्रीडाधिकारी डॉ.स्नेहल पाटील यांचा सन्मान.

कोल्हापूर :

सध्याच्या युगात प्रत्येकाने स्वतःच्या शारीरिक क्षमतेची काळजी घेणे गरजेचे आहे आणि या शारीरिक क्षमतेची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक महिलेने पुढे यावे तसेच प्रत्येक महिलेने लक्षपुर्वक आपल्या कुटुंबातील लहान मुलांमध्ये क्रीडा नैपुण्य विकसित केल्यास सर्वांचे जीवन नक्कीच सुखकर बनेल असे प्रतिपादन कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. स्नेहल पाटील यांनी केले.शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाबद्दल आयोजित केलेल्या सन्मान कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

प्रतिवर्षी शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाबद्दल कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी नुकत्याच कोल्हापुरात रुजू झालेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी आणि मुळ कोल्हापूरच्या निवासी असणार्या डॉ.स्नेहल पाटील यांचा सन्मान सामाजिक कार्यकर्ते आणि बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष रामेश्वर पतकी यांच्या हस्ते डॉ. स्नेहल पाटील यांच्या शिवाजी पेठेतील निवासस्थानी जाऊन करण्यात आला. याप्रसंगी डॉ.स्नेहल पाटील यांनी राज्यसेवा आयोगाच्या माध्यमातून मिळविलेले यश आणि शारीरिक शिक्षणामध्ये मिळवलेली पीएचडी ही केवळ महिलांच्यासाठी नव्हे तर सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार रामेश्वर पतकी यांनी काढले.

याप्रसंगी डॉ. स्नेहल पाटील यांचा कुंडीतील रोपटे आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी शाश्वत प्रतिष्ठान अध्यक्ष डाॅ गुरुदत्त म्हाडगुत, सेक्रेटरी निलेश कांबळे, संचालक संतोष परब, योगेश पोवार, अविनाश टकळे, रंगभूमी परिक्षण मंडळ सदस्य संदीप जाधव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आर डी पाटील सर, सागर पाटील हे उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी डाॅ. स्नेहल पाटील यांनी आपल्या घरी येऊन केलेल्या सन्मानाबद्दल शाश्वत प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देत या सन्मानाने भारावून गेल्याचे सांगितले.यावेळी डॉ. स्नेहल पाटील यांच्या घरातील वातावरण भावुक झाले होते.

या कार्यक्रमाचे संयोजन शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गुरुदत्त म्हाडगुत आणि संतोष परब यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks