स्पर्धा परीक्षा फौंडेशन कोर्समध्ये गारगोटी हायस्कूलच्या कादंबरी भोई व सायली सारंग प्रथम

गारगोटी प्रतिनिधी :
सुराज्य फौंडेशन, वारणानगर यांच्या वतीने आयोजित सुराज्य स्पर्धा परीक्षा फौंडेशन कोर्समध्ये गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयागारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु.कादंबरी रमेश भोई व कु.सायली विक्रम सारंग यांनी प्रथम क्रमांक पटकवला.
गारगोटी हायस्कूलमध्ये सुराज्य फौंडेशन, वारणानगर संचलित सुराज्य स्पर्धा परीक्षा फौंडेशन कोर्स सुरु असून शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेबाबत सकारात्मक मानसिकता तयार व्हावी या उद्देशाने कोर्स सुरु केला आहे. या कोर्समध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार वारणानगर येथे माजी मंत्री, आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
शाळेत कु.कादंबरी भोई व सायली सारंग यांचा सत्कार शिक्षक पालक संघाचे सदस्य, पत्रकार रविराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, स्पर्धा परीक्षा फौंडेशन कोर्सचे समन्वयक डी. जी. लकमले यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.