देवचंद महाविद्यालयामध्ये राज्य क्रीडा दिन उत्साहात संपन्न

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
देवचंद महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. जी. डी. इंगळे यांनी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सौ. एस.पी. जाधव, पर्यवेक्षक डॉ. अशोक डोनर व सर्व स्टाफ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रा डॉ.रवींद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक व खाशाबा जाधव यांचा जीवनपट उलगडून सांगितला. यावेळी क्रीडा विभागाची माजी विद्यार्थिनी कु. सुषमा खवरे हिची बी.एस.एफ. मध्ये निवड झाल्याबद्दल प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. डॉ.रविंद्र चव्हाण यांनी संकलित केलेली खाशाबा जाधव यांची माहितीचे अनावरण करण्यात आले.
यावेळी डॉ.आर. के. दिवाकर , डॉ. के.व्ही.गुरव , प्रा.मनोज काळे, प्रा.अर्चना पाटील, प्रा.विष्णू पाटील, प्रा. महावीर शेंडगे,प्रा.दीपक पाटील,प्रा. टी.ए .पाटील इत्यादी मान्यवर उपस्थीत होते. यानिमित्ताने जिमखाना विभागामार्फत शारीरिक सुदृढता तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ५० शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आभार प्रा.निरंजन जाधव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मा. अशिषभाई शाह , उपाध्यक्षा डॉ.सौ.तृप्तिभाभी शाह, खजिनदार सुभोधभाई शाह यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच जिमखाना कर्मचारी वैभव सोनार, शिवदास चव्हाण, महेश चौगुले, सूरज खवरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.