ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूड परिसरात प्रीपेड मीटर बसवण्यास बंदी करा : शिवसेना (ठाकरे) च्या वतीने मागणी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड परिसरातील गावांत प्रीपेड मीटर बसवण्यास बंदी करावी, तसेच प्रीपेड मीटर बसवलेल्या ग्राहकांच्या अर्जानुसार मीटर तत्काळ बदलून द्यावीत; अन्यथा शिवसेना (ठाकरे) कोल्हापूर जिल्हा व ग्राहकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना कागल तालुकाच्या वतीने मुरगूड महावितरण उपविभागाला निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी उपअभियंता प्रकाश पाटील यांनी निवेदन स्वीकारले. त्यांनी कोल्हापूर विभागाला निवेदन अवगत करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आंदोलनकर्त्यांना सांगितले.
यावेळी शिवसेना कागल संघटक मारुती पुरीबुवा, शिवसेना विभागप्रमुख दिग्विजय पाटील, विजय पाटील, शिवसेना मुरगूड शहरप्रमुख आदिनाथ पाटील, नामदेव भराडे, कृष्णा माने यांच्यासह शिवसैनिक, ग्राहक उपस्थित होते.