संजय गांधी निराधार समिती कागल तालुका सदस्य राजेंद्र आमते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगूड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कागल तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्य राजेंद्र आमते यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येतो यंदाही याच पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला सकाळी मुरगूड येथील ऑक्सीजन पार्क येथे तसेच मुरगूड शहर आणि परिसरात सुमारे शंभर झाडांची वृक्षारोपण करण्यात आले तसेच मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालय कोव्हिड सेंटर येथे रुग्णांना जेवणाचे वाटप करण्यात आले. तसेच मुरगूड येथील अंबाबाई मंदिराच्या कळस बांधकामास एकवीस हजार रुपयाचा निधी सुपूर्त करण्यात आला.
मुरगूड येथील राजेंद्र आमते हे विविध सामाजिक कार्यात नेहमी पुढे असतात महापूर काळात त्यांनी महापुरामुळे नुकसान झालेल्या लोकांना मदत केली होती तसेच कोरणा काळात गेल्यावर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर देखील आयोजित केले होते तसेच इम्युनिटी बूस्टर चे वाटप करण्यात आले होते. तसेच मास्क वाटप गरजूंना धान्य वाटप इत्यादीही कार्यक्रम त्यांनी घेतले होते दरवर्षी त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात सदरचा कार्यक्रम मुरगूड येथील युवा नेते सत्यजितसिंह पाटील आणि दिग्विजय सिंह पाटील यांच्या हस्ते आणि रणजीत सुर्यवंशी मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी नामदेव भांदीगरे अमर देवळे, रवीराज परीट, अॅडव्होकेट सुधीर सावर्डेकर, रणजीत मगदूम बटू जाधव शिवाजीराव सातवेकर डॉ.सुनिल चौगुले, विकी बोरगावे, सुनील मेंडके रणजित रामाणे अमित गोधडे, आकाश शेळके, बबन बाबर, निलेश रामाने यांच्यासह सस्पेन्स ग्रुप व राजू आमचे युवा मंचाचे सर्व सदस्य उपस्थित होते.