कसबा बीड – महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील विसर्जन केलेल्या तीनशे मुर्ती बाहेर काढून केल्या दान; नदी प्रदुषण मुक्तीसाठी नवा उपक्रम

सावरवाडी प्रतिनिधी :
यंदाच्या गणेशोत्सव सोहळ्यातील घरगुती गणपतीच्या मुर्ती कांही भाविकांनी नदीपात्रात विसर्जन केल्या होत्या .नद्यांचे होणारे प्रदुषण टाळावे व नदीतील पाणी अशुद्ध होऊ नये या उदात्य भावनेतून विसर्जीत केलेल्या तीनशे गणपतीच्या मुर्ती बाहेर काढून त्या दान करण्याचा उपक्रम करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सुर्यवंशी यांनी युवकांच्या सहकार्यातून राबविण्यात आला
करवीर तालुक्यातील कसबा बीड , महे या गावातील घरगुती व सार्वजनिक गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन भोगावती नदी पात्रात भाविकांनी केले होते . गेल्या दोन दिवसामध्ये भोगावती व तुळशी नद्यांच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली . नदीपात्रात विसर्जीत केलेल्या मुर्तीच्या विविध रंगामुळे नद्यांच्या पात्रातील पाणी दुषित होऊन नये . नद्यांच्या पात्रातून मुर्ती बाहेर काढून नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला .
नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने या गणपतीच्या मुर्ती उघड्यावर पडलेल्या होत्या . या सर्व मूर्ती एकत्र करून महे व बीड ग्रामपंचायतीने संकलन केलेल्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पोच करण्यात आल्या .
या उपक्रमात करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सुर्यवंशी , महे गावचे युवा नेते उत्तम पाटील,जगदीश पाटील,राम हुजरे,स्वरूप पाटील,केतन जाधव,गोरक्ष वाघमारे सचिन पाटील,युवराज बोराटे, संदीप जरग,सुधाकर पाटील,हिंदुराव तिबिले, यांनी कठोर परिश्रम घेतले .