ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बी.एम.पाटील यांची सरपंच परिषद मुंबईच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी संपर्क प्रमुखपदी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भडगांव ता.कागल येथील सरपंच बी एम पाटील यांची सरपंच परिषद मुंबईच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी संपर्क प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली.
पाटील यांचे सहकार व सामाजिक क्षेत्रातील काम,सरपंच परिषदेच्या कामकाजातील सक्रिय सहभाग लक्षात श्री.पाटील यांना प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस,प्रदेश उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव,विश्वस्त शिवाजी मोरे,आनंद जाधव,बापू जगदाळे,जिल्हाध्यक्ष जी.एम.पाटील, जिल्हा समन्वयक ॲड. दयानंद पाटील आदी उपस्थित होते.