मुरगूड येथे श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना वर्षपूर्ती निमित्त आनंदोत्सव

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
संपूर्ण भारत वर्षाला ज्या क्षणाचे प्रतीक्षा होती ते राम मंदिर गेल्या वर्षी पूर्ण झाले आणि सर्व भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. या प्रतिष्ठापनेची वर्षपूर्ती म्हणून मुरगुड शहर राम मंदिर आयोध्या न्यास उपखंड मुरगुड हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्ते, आणि मुरगुड शहर नागरिक यांच्या वतीने आनंदोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानुसार सकाळी 6.30 वाजता मुरगुड येथील श्रीराम मंदिरातील श्रीराम पंचायतन मूर्तीस महा अभिषेक करण्यात आला. यानंतर आकर्षक पूजा बांधण्यात आली. 11 वाजता रामरक्षा पठण, हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा पठण आणि रामनाम जप करण्यात आला.
यानंतर 12 वाजता महाआरती करून लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली तसेच दिवसभर श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी होती.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजनासाठी तानाजी भराडे , शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, प्रकाश पारिशवाड, अनुबोध गाडगीळ,संकेत शहा, डॉ. संजय दिवाण , रघुनाथ पोतदार, महादेव वागणेकर, धनंजय सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.यावेळी राम भक्त शिवभक्त आणि मुरगूड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.