मुरगूडला स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा उत्साहात

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा, पादुकापूजन, श्रींची आरती असा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.
यावेळी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज व पादुकांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष किरण गवाणकर, उपाध्यक्ष प्रकाश सणगर व संचालकांनी केले. यावेळी मडिलगे येथील भजनी मंडळाच्या टाळ-मृदंगाच्या गजरात भाविक मंत्रमुग्ध झाले.
स्वामी भक्तांनी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सोहळ्यानिमित्त लाडू, पेढ्यांच्या प्रसादाचे वाटप केले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडे दैनंदिन अन्नछत्र योजनेंतर्गत अन्नदानापीत्यर्थ संस्थेकडून अन्नछत्रासाठी २१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
यावेळी संचालक प्रशांत शहा, किशोर पोतदार, साताप्पा पाटील, शशिकांत दरेकर, नामदेवराव पाटील, धोंडिबा मकानदार, निवास कदम, संदीप कांबळे, संचालिका रोहिणी तांबट, सुनंदा जाधव, सुदर्शन हुंडेकर, चंद्रकांत माळवदे, दत्तात्रय तांबट, विनय पोतदार, नवनाथ डवरी आदी उपस्थित होते.