क्रेशरवर कामावर असणाऱ्या परप्रांतीयाकडून मुलीचे अपहरण ; कागल तालुक्यातील प्रकार,आरोपी मध्य प्रदेशचा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील सुरुपली गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगीचे अपहरण झाल्याची घटना दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वा. मुलगी कुरुकलीच्या शाळेला जाते असे सांगून घरातून निघाली होती. मात्र, ती नंतर घरी परतली नाही. मुलगीच्या वडीलांनी मुरगूड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदवली
वडिलांसोबत क्रेशरवर कामावर असणाऱ्या परप्रांतीयानेच मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार उघङकीस आला आहे. अपहृत मुलीला आरोपीसह मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात मुरगुड पोलिसांना यश आले आहे.
उमेश सोहम धुलिया रा. राजेंद्रग्राम जी. अनुपपुर असे मुलीस अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
सदर आरोपी हा मुलीच्या पालकांसोबत एकच ठिकाणी क्रेशरवर काम करीत होता. सीसीटीव्ही तपासणींमध्ये सदर मुलगी मध्य प्रदेश मध्ये गेल्याचे दिसून आल्यानंतर पोलीसांनी मध्य प्रदेश गाठले. तेथे आरोपीस ताब्यात घेऊन त्यासोबत मुलीस देखील सोबत घेतले.