मुरगुड : विश्वनाथराव पाटील सहकारी बँक “उत्कृष्ट बँक ” पुरस्काराने सन्मानित

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील हिरक महोत्सवी विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेला सन २०२२ – २३ या वर्षातील “उत्कृष्ट बँक” म्हणून पुरस्कार दमण येथे रिझर्व बँकेचे एक्स सी. जी. एम. पी. के. अरोरा व बॅको ब्लयू रिबन चे अध्यक्ष अविनाश शिंत्रे यांचे हस्ते वितरित करण्यात आला.
यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील, व्हाईस चेअरमन वसंतराव शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगुले, सुखदेव वरपे उपस्थित होते. या पुरस्कारासाठी देशातील तब्बल ११ राज्यातून बँकांची माहिती घेऊन हा पुरस्कार वितरित केला जातो.
ग्रामीण भागातील सहकारातील पारदर्शी कार्य करणारी विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँक ही एक आदर्शवत बँक आहे. या बँकेचे सर्व पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक या सर्वांच्या योगदानाचे हे फलित आहे या पुरस्काराने समाज स्तरावरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.