ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत शिवसेना खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह ४० प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत यांच्या नावाचा समावेश आहे.

कोकणातील ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अॅड. अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा नावाचा देखील या यादीत समावेश आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही यादी प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे.

शिवसेना नेत्यांबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव यांचेही नाव यादीत आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी यांना देखील स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आले आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks