ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेद प्रज्ञाशोध परीक्षेत सरवडेच्या जिज्ञासा क्लासची हर्षाली रेपे जिल्हयात प्रथम

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सरवडे ता . राधानगरी येथिल जिज्ञासा क्लासच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी वेद प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात व जिल्ह्यात घवघवीत यश संपादन केले .

माई एज्यूकेशन सोसायटी व वेद पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय घेतलेल्या वेद प्रज्ञाशोध परीक्षेत सरवडेच्या जिज्ञासा मार्गदर्शन वर्गातील कु . हर्षाली बाबासाहेब रेपे हीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला . तर सेजल स्वप्नील पेडणेकर याने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला .

दिव्या संजय कोपार्डेकर, राजविर राकेश फराकटे जिल्हयात व्दितीय क्रमांक तर आराध्या कृष्णात कुदळे हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला .
या वेद- प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांचे व सरवडेच्या जिज्ञासा क्लासच्या मार्गदर्शक शिक्षिका सौ . दिपाली बाबासाहेब रेपे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks