मुरगूडच्या श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी किरण गवाणकर यांची निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता . कागल येथिल ” आदर्श सहकारी पतसंस्था ” गौरव पुरस्कार प्राप्त ” श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री . किरण विठ्ठल गवाणकर यांची तर व्हा . चेअरमनपदी प्रकाश धोंडीराम सणगर यांची एकमताने निवड करण्यात आली .
निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कागल तालूका सहकारी संस्था सहायक निबंधक एस .एस. पाटील यानीं काम पाहिले .
बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे –
श्री . किशोर पोतदार , साताप्पा पाटील , प्रशांत शहा , नामदेवराव पाटील , शशिकांत दरेकर , प्रदिप वेसणेकर , धोंडीराम मकानदार , निवास कदम , संदीप कांबळे , महिला प्रतिनीधी सौ . रोहिनी तांबट , सौ . सुनंदा जाधव .
या चेअरमन व्हा . चेअरमन निवड प्रसंगी कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर ,यांच्यासह कर्मचारी वर्ग
उपस्थित होता.
निवड प्रक्रियेनंतर मुरगूडमधील -सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री . अनंत फर्नांडिस , व्हा . चेअरमन श्री विनय पोतदार , संस्थेचे पदाधिकारी जवाहर शहा , पुंडलिक डाफळे, चंद्रकांत माळवदे , नवनाथ
डवरी यानीं संस्थेला भेट देऊन नूतन चेअरमन , व्हा .चेअरमन यांचा यथोचित सत्कार करुन शुभेच्छा दिल्या .