प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा ; २७ तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती

प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना २७ तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आम्ही चार जागांवर ठाम आहोत. महाविकास आघाडीत काही मतदारसंघात मतभेद दिसून येत आहेत. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंरतु ज्या मतभेदाच्या जागा आहेत ते जाहीर केलेले नाहीत. त्याच्यामध्ये काही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. तर शिवसेनेने त्याबाबत आक्षेप घेतलेला नाही.
येत्या एक ते दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. ते चित्र स्पष्ट झालं की ते आमच्यासोबत चर्चा करायला तयार असतील तर आम्ही देखील त्यांच्यासोबत बसायला तयार आहे, असंही पुढे आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. त्यांचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे त्यांच्या याद्या जाहीर होत नाहीयेत. मी त्यांनी दिलेल्या ४ जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी मी माझ्या पक्षाच्या वतीने २७ मार्चला माझा अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे, तर २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करू असंही पुढे ते म्हणाले आहेत.