ताज्या बातम्यामहाराष्ट्र
लोकसभा निवडणुक : काँग्रेसची चौथी यादी जाहीर महाराष्ट्रातील चार नावांवर शिक्कामोर्तब

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी 46 उमेदरावाराची चौथी उमेदवारी जाहिर केली आहे. यात महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होत असलेल्या पाचपैकी चार मतदारसंघासाठी काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली आहे.
नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा-गोंदियामधून डॉ. प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूरमधून डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर, काँग्रेसने चंद्रपूर मतदारसंघातील नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. चंद्रपूरमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान असतानादेखील काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहिर केलेला नाहीये.