मंडलिक महाविद्यालयात बक्षीस वितरण

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयांमध्ये इतिहास विभागाने घेतलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .संपूर्ण देशात व महाराष्ट्रात चालू वर्षे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकाचे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे महाराष्ट्र शासनाने देखील प्रत्येक महाविद्यालयाला विविध उपक्रम घेऊन साजरे करण्यास कळविले आहे त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयात निबंध स्पर्धा घेण्यात आली.
या निबंध स्पर्धेचे परीक्षण श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ धीरज शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ पी आर फराकटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार होते प्रमुख पाहुणे म्हणून मुरगुड चे नगरसेवक बाजीराव गोधडे व सुहास खराडे होते.
त्याचबरोबर प्रमुख उपस्थित मध्ये मुरगुड चे माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर शिवराज ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य प्रा महादेव कानकेकर व कुस्ती कोच दादा लवटे संभाजी मांगले उपस्थित होते.
या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक साक्षी पुंडलिक सूर्यवंशी (२१००रुपये, प्रमाणपत्र व शील्ड) द्वितीय क्रमांक साक्षी संजय कदम (१५००रुपये, प्रमाणपत्र व शिल्ड), तृतीय क्रमांक आरती परसराम गिरी बुवा (११००रुपये,प्रमाणपत्र व शिल्ड) उत्तेजनार्थ शबनम कमाल पाशा मुल्ला व श्रेया संतोष कुंभार (प्रमाणपत्र व शील्ड) अशी बक्षिसे देण्यात आली सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले .
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा संजय हेरवाडे व प्रा अर्चना कांबळे यांनी केले तर आभार प्रा प्रशांत कुचेकर यांनी मांनले.