ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल तालुक्यात व्हॉलीबॉल मध्ये मुरगूड विद्यालय अव्वल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागल तालुकास्तरीय शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटात येथील मुरगूड विद्यालय (ज्युनि कॉलेज) च्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.कागल येथे शाहू हायस्कूल मध्ये उत्साहात या स्पर्धा पार पडल्या.विविध गटात सुमारे ४० संघांनी सहभाग घेतला होता.

मुरगूड विद्यालयाचा पहिला सामना कागल येथील जयसिंगराव घाटगे हायस्कूल बरोबर झाला. यामध्ये सर्वच खेळाडूंनी सांघिक कामगिरी केल्याने मुरगूड विद्यालयाने सलग २५-१७, व २५-१९ अशा गुण फरकाने विजय मिळवला आणि पुढील फेरीत प्रवेश केला.त्यानंतर कागल मधील शाहू हायस्कूल बरोबर झालेल्या सामन्यात ही सलग दोन सेट मध्ये पराभव करत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामन्यात शिवराज विद्यालय यांच्या बरोबर अटीतटीची लढत झाली.यामध्ये ही सलग दोन सेट मध्ये विजय मिळवत मुरगूड विद्यालयाने अजिंक्यपद पटकावले.

विजेत्या संघात वरद घाटगे,आयुष मोरबाळे,रणवीर घाटगे,लगमान्ना डोणे,शौर्य शेणवी,आचल कांबळे, ओंकार पाटील,श्रेयस पाटील,समर्थ रानगे,श्रेयस कोंडेकर,विश्वजित कांबळे,यश दबडे,स्वयंम बाबर,यांचा समावेश होता.त्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानी ताई देसाई उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत,चेअरमन मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई कोजीमाशीचे चेअरमन बाळ डेळेकर ,प्राचार्य एस आर पाटील,उपमुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी, उपप्राचार्य एस.पी. पाटील, पर्यवेक्षक एस.डी.साठे प्रशिक्षक अनिल पाटील, एस.एस.कळत्रे, एम.एच.खराडे, व्ही.आर.गडकरी, विषु रामाने, अजय बोटे, सुनील घाटगे,निलेश चौगले मुरगूड व्हॉलीबॉल असोसिएशन यांचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks