काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर , 7 नावांवर शिक्कामोर्तब

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात 19 एप्रिलपासून 1 जून अशा सात टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यातच आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या 57 लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.यात महाराष्ट्रातील सात उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
▪️पुणे – रविंद्र धंगेकर
▪️कोल्हापूर – शाहू महाराज
▪️सोलापूर – प्रणिती शिंदे
▪️अमरावती – बळवंत वानखेडे
▪️नंदुरबार – गोवाल पाडवी
▪️नांदेड – वसंत चव्हाण
▪️लातूर – शिवाजीराव कालगे