पन्हाळा : बाजारभोगाव येथील सराफी दुकानातून ८५ हजाराचे दागिने लंपास ; कळे पोलिसांसमोर आव्हान , हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले

कळे-प्रतिनिधी : अनिल सुतार
बाजारभोगाव (ता.पन्हाळा) येथील सराफी दुकानातून दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून दोन अनोळखी व्यक्तींकडून ८५ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवार( दि.२० ) रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद अवधूत रामचंद्र जाधव ( सध्या रा. बाजारभोगाव ) यांनी कळे पोलिसांत दिली असून जणूकाही चोरांकडून पोलिसांनाच आव्हान दिले असल्याची व कळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कोणती भुमिका घेतली जाणार याची जाणकारांतुन चर्चा व्यक्त होत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की बाजारभोगाव येथे अवधूत जाधव यांचे अमृता ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. या दुकानात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अंदाजे ५५ ते ५८ वर्षे वयोगटातील, उंची अंदाजे ६ फूट , रंगाने निमगोऱ्या असणाऱ्या दोन अनोळखी व्यक्ती दागिने खरेदी करण्याच्या बहाणा करून आल्या . त्यांनी काउंटरच्या कप्यातील बॉक्स मधील गंठणचे सोन्याचे पेंडल, मनिमंगळसूत्र, सोन्याच्या कानातील डिझाईनच्या रिंगा असे एकूण ८५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले असुन या ज्वेलर्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नसल्याचा फायदा चोरांनी घेतला असल्याचे समजते .
कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून चोरांना पकडण्याचे कळे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसमोर आव्हान असून अशा चोरांना पकडण्यात बऱ्याच वेळेला पोलिसांना अपशय येत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.तसेच बऱ्याच वेळेला एखाद्या चोरीची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या व्यक्तीची पोलिसांकडून तक्रार घेतली जात नसल्याचे किंवा टाळाटाळ करण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षकांकडुन याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा व्हावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकांतुन व्यक्त होत आहे.