ताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांनी घेतली शाहू महाराजांची गळाभेट ; फक्त प्रचार नाही विजयी सभेलाही येणार; उद्धव ठाकरेंनी मशाल पेटवली!

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कोल्हापूर,”मी शाहू महाराजांच्या प्रचाराला येणार असं मी त्यांना वचन दिले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी तेजस ठाकरेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची गळाभेट घेतली.

शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, ठाकरे कुटुंबिय आणि शाहू महाराज यांचे ऋणानुबंध अतूट आहेत. महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचे नाव लोकसभेसाठी जाहीर करण्यात आले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. विजयी मेळाव्याला देखील मी येणार, असा शब्द शाहू महाराजांना दिलेला आहे. मीही शाहू महाराजांच्याकडे काहीतरी मागितलं आहे. त्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये शाहू महाराजांची साथ मिळावी, अशी इच्छा बोलून दाखवली आहे.

शाहू महाराजांच्या विजयी सभेलाही येणार
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शाहू महाराजांना शिवसैनिक ताकदीने विजयी करतील कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. मी फक्त आत्ताच आलोय. मी शाहू महाराजांचा प्रचार करणार आहे. शिवाय त्यांच्या विजयी सभेला देखील येणार आहे. आमच्या विजयासाठी मी त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे 1997 मध्ये इथे आले होते. त्यानंतर मी प्रथमच या ठिकाणी आलो आहे. आम्ही महाराजांना पूर्ण ताकदीने विजयी करणार आहोत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks