ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागलमध्ये शुक्रवारी दिव्यांगाना साहित्य वाटप मेळावा ; नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसचे आयोजन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागलमध्ये शुक्रवारी दि. १५ दिव्यांगाना साहित्य वाटप मेळाव्याचे आयोजन केले आहे. नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित या मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पाच हजार दिव्यांगाना विविध साहित्य आणि उपकरणांचे वाटप होणार असल्याची माहिती, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील यांनी दिली. येथील छत्रपती राजर्षी शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असल्याचेही ते म्हणाले.

कागलमध्ये शासकीय विश्रामगृह येथे दिव्यांग मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री. पाटील बोलत होते.

भाषणात श्री. पाटील पुढे म्हणाले, कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात कागल – दि. २१/०२/२०२४, मुरगुड- दि. २२/०२/२०२४, गडहिंग्लज- दि. २३/०२/२०२४ व उत्तूर – दि. २४/०२/२०२४ येथे विभागीय दिव्यांग मेळावे झाले. या मेळाव्यांमधून तपासणी (स्क्रीनिंग) होवून त्यामधून ऐकू न येणारे, कमी ऐकू येणारे, हात -पाय हे अवयव नसणारे रुग्ण नोंद झाले. तसेच; वृद्ध व दिव्यांग नागरिकांनीही व्हीलचेअर, वॉकर, तीनचाकी सायकल, ट्रीपाॅड काठी, श्रवणयंत्रे यासाठी नोंदणी केलेल्या सर्वांना वाटप होणारे साहीत्य असे, व्हीलचेअर- ५३७, वाॅकर- ४८७, तीनचाकी सायकल- ३८०, ट्रीपाॅड काठी- ६०० व श्रवणयंत्रे- १६८९. तसेच या विभागीय मेळाव्यांमधून ४३५ जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाही यशस्वी झाल्या आहेत.

नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, विविध विधायक सामाजिक उपक्रम हाती घेऊन फाउंडेशन नेहमीच कार्यरत आहे. नुकताच रोजगार मेळावा यशस्वी झाला. त्यापाठोपाठ हा दिव्यांग मेळावा होत आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सेवाभावी वृत्तीने गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सातत्याने सुरू आहे.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, जयपूर फूट आणि जयपूर हात हे दोन्हीही प्रकारचे कृत्रिम अवयव दिव्यांग रुग्णांच्या ज्या- त्या वेगवेगळ्या मापानुसार तयार होत आहेत. त्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र वितरण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर केले जाणार आहे.

यावेळी आजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, जिल्हा परिषदेची माजी सतीश पाटील- गिजवणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, आजरा पंचायत समितीचे सभापती शिरीष देसाई, कागलचे माजी नगराध्यक्ष नवल बोते, सतीश घाडगे, विवेक लोटे, सागर गुरव, संदीप भुरले, सागर भुरले, अर्जुन नाईक, प्रवीण काळबर, सुनील कदम, अमित पिष्टे, अमर मांगले, सुधीर सावंत, बच्चन कांबळे, विजय काळे, पंकज खलीप, शिवा मोरे, अभय पाटील, सुरेश शिंदे, प्रवीण सोनुले आदी प्रमुख उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks