गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

राधानगरी प्रांताधिकाऱ्यासह सरपंचाला साडेपाच लाखांची लाच घेताना अटक

राधानगरी :

स्टोन क्रेशर व्यवसायावरील कारवाई टाळण्यासाठी ११ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी साडेपाच लाखांची लाच घेताना फराळे (ता. राधानगरी) येथील सरपंच संदीप डवर यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान यांना ताब्यात घेण्यात आले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आज (रविवार) सापळा लावून कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदाराचा फराळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्टोन क्रेशरचा व्यवसाय आहे. स्टोन क्रेशरचा त्रास होत असल्याचे कारण देत सरपंच डवर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने तक्रारदार याला क्रेशर का बंद करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली होती. तसेच या नोटिशीच्या आधारे प्रांताधिकारी प्रधान यांनीही नोटीस बजावली होती. दरम्यान, ही कारवाई टाळण्यासाठी सरपंचाने स्वतःला दरमहा एक लाख रुपये आणि प्रांताधिकारी प्रधान यांना १० लाख रुपये अशी लाचेची मागणी केली होती.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks