ओंजळ सांडण्याआधी दुसऱ्याला द्यायला शिका : प.पू. प्राणलिंग स्वामीजी

श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ गोशाळेत गोमाते साठी सप्तकोणी कट्टा बांधण्यात आला यावेळी वनाधिकारी प्रशांत गवरानी आणि परिवार यांच्याकडून हा कट्टा श्री वीरूपाक्षलिंग समाधी गोशाळे ला अर्पण करण्यात आला यावेळी या पार कट्टा चे उद्घाटन प.पू.प्राणलिंग स्वामीजी आणी वनअधिकारी प्रशांत गवरानी सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे स्वामीजी म्हणाले की आजचा हा समाज जो चालत आहे तो समाजातील दानशूर व्यक्तींच्या जीवावरच हा समाज चालत आहे आपली ओंजळ भरून सांडण्यापेक्षा दुसऱ्याला देणे हे कितीही पटीने चांगला आहे समाजामध्ये असे दानशूर लोक आहेत म्हणूनच म्हणूनच हा समाजाचा समतोल राखला गेला आहे आज वन अधिकारी प्रशांत गवरानी व त्यांच्या परिवारा यांच्या वतीने समाधी मठ गौशाळेमध्ये गोमातेसाठी पार कट्टा बांधण्यात आला .
यावेळी प्रशांत गवरानी बोलते वेळी म्हणाले की हिंदू धर्मामध्ये गोमातेला आपली माता समजले आहे आज आपण जाप्रमाने आई-वडिलांची सेवा करतो त्याचप्रमाणे गौ मातेची सेवा करणे हे आपले परम कर्तव्य आहे आयुर्वेदामध्ये मातेला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे गोमाता ही मनुष्याचे जीवनामध्ये कडून ईश्वराकडून अनमोल देणगी मिळाली आहे याचे संगोपन करणे हेच ही समाजामधील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे असे मत वनाधिकारी प्रशांत गवरानी यांनी केले.
यावेळी कार्यक्रमासाठी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्रभुलिंग स्वामीजी, वनधिकार प्रभाकर गोकाक, श्रीशैल वानसे, शंकर तावन्शी, गिरीश पाटील श्रीधर मुंडे,श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठचे ट्रस्टी सुरेश शेट्टी, राजू वळावे, दयानंद शिपुरे, तसेच समाधी मठ येथील भक्त गण उपस्थीत होते.