ताज्या बातम्यामहाराष्ट्र
विद्यार्थी हक्क कृती समिती,महाराष्ट्र राज्य (VHKS) यांची पदाधिकारी निवडी व आढावा बैठक पार

तुरंबे प्रतिनिधी :
विद्यार्थी हक्क कृती समिती,महाराष्ट्र राज्य (VHKS) कोल्हापूर जिल्हा यांची आज आढावा बैठक व पदाधिकारी निवडी पार पडली. यावेळी प्रदेश सरचिटणीस मा.श्रीशैल पाटील यांनी सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. समितीची पुढील धोरणे ठरवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात खूप मोठा विस्तार करण्याचे प्रयत्न मा.श्रीशैल पाटील व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा.अरुण भारमल जोराने काम सुरु आहे.
यावेळी राधानगरी, कागल, भुदरगड या तीन तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी विद्यार्थी वर्गाने पुढे येऊन काम करण्याचे सांगितलं.
यावेळी उपस्थित श्रीकर भोई,प्रणव पालकर,आशिष पोवार, विवेक बेलेकर, विपुल गोंगाणे, सुहास राऊत इ. पदाधिकारी उपस्थित होते.