ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पन्हाळा : मरळी येथील महादेव दूध संस्थेचा नियमबाह्य मनमानी कारभार ; सभासदांनी केली चौकशीची मागणी

कळे-वार्ताहर अनिल सुतार

मरळी (ता.पन्हाळा) येथील महादेव सहकारी दूध संस्थेचे पदाधिकारी नियमबाह्य मनमानी कारभार करत असल्याचा गंभीर आरोप सभासदांनी केला आहे. संस्थेची कायदेशीर चौकशी करण्याबाबत सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध); कोल्हापूर यांना निवेदन दिले आहे. निवेदनाप्रमाणे संस्था अध्यक्ष यशवंत आनंदा पाटील व सचिव विष्णू बाबू पाटील हे संगनमताने संस्थेचे नियमबाह्य काम करत आहेत.

स्वतःच्या लाभा करीता स्वतःच्या दुधात एकसारखे समान वाढीव फॅट लावून इतर दूध उत्पादकांवर अन्याय करत आहेत. तसेच सदर दूध संस्थेची आजअखेर कोणत्याही प्रकारे निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता आपलेच सदस्य निवडून घेत आहेत. संस्थेचा अनाठायी खर्च केला आहे. स्वार्थापोटी पदाचा दुरुपयोग करत आहेत.

संघ नियमाप्रमाणे कोणतेही कामकाज होत नाही. दूध फॅट मशिनमध्ये फरक केलेला आहे. दूध उत्पादकांचे नुकसान होत आहे. कांही कागदपत्रांची मागणी केली असता ती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत. तरी संस्थेची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी. निवेदनावर आनंदा पाटील, शहाजी पाटील, विष्णू तळसकर, बाबुराव चौगले, रंगराव पाटील, सुरेश पाटील यांच्या सह्या आहेत.

सभासदांना सर्वांपेक्षा जास्त लाभ दिला आहे. एस.एन.एफ, फॅट, वजन करेक्ट आहे. झालेल्या एकूण खर्चातील कोणताही खर्च अनाठायी असल्याचे त्यांनी दाखवावे. निवडणुकीचा होणारा खर्च वाचावा. त्याचा बोजा संस्थेवर पडू नये म्हणून निवडणूका बिनविरोध केल्या आहेत. –
यशवंत पाटील
(अध्यक्ष; महादेव दूध संस्था, मरळी)

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks