ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली : समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी :

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार दिलेला शब्द पाळत तर नाहीच पण वीज बिलाबाबत दिलेला शब्द त्यांनी केवळ आठ दिवसात फिरविला आहे. तसेच प्रोत्साहन अनुदानाबाबत कोणताच ठोस निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. अशी टीका शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

ते म्हणाले, सरकारने राज्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांची कनेक्शन तोडण्यासाठी आठ दिवसापूर्वी स्थगिती दिली होती. मात्र अधिवेशन संपताच ही स्थगिती उठवली आहे .त्यांच्या या धोरणामुळे महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार राज्य शासनाकडून करण्यात आला आहे.

ते पुढे म्हणाले, प्रामाणिकपणे कर्ज भरणा-या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान व लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करण्यासाठीची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनात करून हे सरकार राज्यातील शेतकरी व ग्राहकांना दिलासा देईल.अशी आशा होती. परंतू यामध्येही सरकारने फसवणूक केली आहे.

प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, दोन लाख रुपयांच्या वरील कर्ज माफी,अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी वाढीव भरपाई अनुदान, लॉकडाऊन काळातील वीज दरवाढ व माफी आणि विशेष म्हणजे मराठा आरक्षण अशा सर्वच मुद्द्यांवर हे आघाडी सरकार अपयशी ठरले आहे.

अन्यथा सरकारला जनतेच्या फार मोठ्या रोषास सामोरे जावे लागेल.

थकबाकीदारांची वीज कनेक्शन न तोडण्याचा आदेश मागे घेताच वीज कर्मचारी आज पहिल्या दिवशी या ग्राहकांच्या दारात जाऊन वीज कनेक्शन कापत आहेत. हा सर्वसामान्य जनतेवर फार मोठा अन्याय आहे.त्यामुळे कनेक्शन कट करणे तात्काळ थांबवा.अन्यथा सरकारला जनतेच्या फार मोठ्या रोषास सामोरे जावे लागेल.असेही घाटगे म्हणाले,

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks